About us
पुणे अकॅडेमी फॉर कॉम्पिटिटिव एक्झाम्स ही संस्था श्री रणजीत (समीर) टकले सर यांनी 2015 मध्ये स्थापन केली. सन 2014 साली यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज च्या माध्यमातून मार्गदर्शन देत संस्थेची पायाभरणी झाली. पिंपरी-चिंचवड परिसरात विद्यार्थ्यांची गरज ओळखून संस्थेने निगडी येथे कार्यास सुरवात केली. यानंतर यशस्वीपणे एमपीएससी – राज्यसेवेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू केले. विस्ताराचा भाग म्हणून सरळसेवा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनादेखील संस्थेत मार्गदर्शन मिळत आहे.
संस्थेची 10 जणांची टिम सांघिक भावनेने देशाला संवेदनशील, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि चारित्र्यसंपन्न अधिकारी देशसेवेस समर्पित करणे या ध्येयाने काम करत आहे. संस्थेचे संस्थापक रणजीत टकले यांनी पुण्यातील अनेक नामांकित स्पर्धा परीक्षा केंद्रात गेले कित्येक वर्ष मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांना यशाचे मार्ग गवसले आणि आज ते देशसेवेत बहुमूल्य योगदान देत आहेत.
गळेकापू स्पर्धा आणि स्वार्थ हे समीकरण बनत असताना, संस्था सहयोगात्मक यश ही नवी संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करत आहे . त्यातूनच सहयोगात्मक स्पर्धेतून यशाकडे या दृष्टीकोणाची निर्मिती झाली. माणूसकीच्या अशा मूल्यांना रुजवण्याचा संस्था अविरत प्रयत्न करत आहे. संस्थेने मागील काही वर्षात पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा माहितीसत्रांपासून ते चारित्र्यसंपन्नता आणि करियर अशा अनेकविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
Vision
( Conquering the world through
co-operative competition. )
Mission
( Devoting sensitive, dutiful, honest & professional officers to national service. )
