तलाठी व झेडपी(ZP)

ग्राम स्तरावर महसूल विभागामध्ये तलाठी हा कनिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असतो. गावपातळीवर महसूल, शेती व जमीन इत्यादि विषयक कामांशी तलाठी संबंधित असतो. ग्रामीण स्तरावर तो गाव व तालुका प्रशासन यांमधील एक प्रमुख दुवा असतो.

कोणतीही पदवीधर व्यक्ति तलाठी भरती परीक्षेसाठी पात्र असते.

वयोमर्यादा: खुला वर्ग- 38 वर्षे, आरक्षित वर्ग- 43 वर्षे

जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास विभाग, आरोग्य विभाग, गृह विभाग व कृषि विभाग यातील ग्रामसेवक, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, सांखिकी अधिकारी व लिपिक अशा अनेकविध पदांवर या परीक्षेद्वारे नियुक्ती होते. झेडपी(ZP) च्या या पदांसाठी एकच online परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा अभ्यासक्रम व पात्रता ही तलाठी परीक्षेसारखी असते. ZP अंतर्गत भरल्या जाणार्‍या व्यावसायिक पदांसाठी संबंधित तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षेत अंतर्भूत केला जातो.

Online परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Multiple choice) स्वरूपाची असते.

ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप

ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप
विषयप्रश्नगुण
मराठी 2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान 2550
अंकगणित2550
एकूण प्रश्न100200
परीक्षा कालावधी120 min.

तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम:-

मराठी – समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, – नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकार, मराठी साहित्य व साहित्यिक, आकलनक्षमता (उतार्‍यावरील प्रश्न) इत्यादि.

इंग्रजी – Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & टाइप्स of tense, question tag, use proper form of verb, spot the verb, verbal comprehension passage etc, spellings, sentence structure, one word substitutions, phrases.

अंकगणित व बुद्धिमत्ता– बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग, संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची, परिमाणे, घड्याळ, अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा, शब्द व अंक ओळखणे, सॅमसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून, निष्कर्ष, वेन आकृती

सामान्यज्ञान– महाराष्ट्चा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी – सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन


पुणे अकॅडेमी मार्फत या परीक्षेसाठी मार्गदर्शनाचे वर्ग वर्षभर चालवले जातात. साधारणता 10 महिन्यांच्या कालावधीत परीक्षेचा अभ्यासक्रम सखोलतेने शिकवला जातो. परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन खालीलप्रमाणे Lectures मध्ये विभागलेले आहे. दर आठवड्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे Lectures आयोजित केले जातात. मैदानी परीक्षेचा सरावही नियमितपणे घेतला जातो.

WhatsApp chat