पोलिस भरती

पोलिस शिपाई, लोहमार्ग शिपाई, कारागृह शिपाई व पोलिस बॅण्ड्स्मन अशा पदांसाठी महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याकडून पोलिस भरती ची परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा बारावी पास 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ति देऊ शकते. ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा ऑनलाइन परीक्षेचा 100 मार्क्स चा असतो व दुसर्‍या टप्प्यात मैदानी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे प्रत्येत नागरिकाला वर्दी घालून देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होण्याची संधी मिळते.

ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप

ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप
विषयप्रश्नगुण
अंकगणित2525
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
बुद्धिमत्ता चाचणी2525
मराठी व्याकरण2525
एकूण प्रश्न100100
परीक्षा कालावधी90 Min

पोलिस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम:-

मराठी – समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, – नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकार, मराठी साहित्य व साहित्यिक, आकलनक्षमता (उतार्‍यावरील प्रश्न) इत्यादि

अंकगणित– बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग, संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची, परिमाणे, घड्याळ

बुद्धिमत्ता– अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा, शब्द व अंक ओळखणे, सॅमसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून, निष्कर्ष, वेन आकृती

सामान्यज्ञान व चालू घडामोडी– महाराष्ट्चा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी – सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन

पुणे अकॅडेमी मार्फत या परीक्षेसाठी मार्गदर्शनाचे वर्ग वर्षभर चालवले जातात. साधारणता 10 महिन्यांच्या कालावधीत परीक्षेचा अभ्यासक्रम सखोलतेने शिकवला जातो. परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन खालीलप्रमाणे Lectures मध्ये विभागलेले आहे. दर आठवड्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे Lectures आयोजित केले जातात. मैदानी परीक्षेचा सरावही नियमितपणे घेतला जातो.

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
महारष्ट्राचा भूगोल15 Lectures
भारताचा भूगोल10 Lectures
महारष्ट्राचा इतिहास10 Lectures
भारताचा इतिहास10 Lectures
संविधान + पंचायत राज10 Lectures
अर्थशास्त्र07 Lectures
विज्ञान18 Lectures
चालू घडामोडी20 Lectures

गणित

गणित
अंकगणित45 Lectures

बुद्धिमत्ता

बुद्धिमत्ता
बुद्धिमत्ता चाचणी35 Lectures

मराठी

मराठी
मराठी व्याकरण40 Lectures

सराव

सराव
Revision30 Lectures
Online Test5 (100 Questions)

या परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शारीरिक शैक्षणिक व इतर पात्रता असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता
12 पास (HSC)

प्रवर्ग

प्रवर्गकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
किमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
खुला18 वर्षे28 वर्षे
मागास प्रवर्ग (अ जाती, अ जमाती, वि. जा. अ,
भ.ज. -ब, भ.ज. – क, भ.ज. – ड, वि. मा. प्र,
इ. मा. व, एस. इ. बी.सी, इ. डब्लू. एस,)
18 वर्षे33 वर्षे
प्रकल्पग्रस्त उमेदवार18 वर्षे45 वर्षे
भूकंपग्रस्त उमेदवार18 वर्षे45 वर्षे
माजी सैनिक उमेदवार18 वर्षेउमेदवाराच्या सशस्त्र दलात
झालेल्या सेवेइतका कालावधी
अधिक ३ वर्षे इतकी राहील
अनाथ18 वर्षे28 वर्षे
पदवीधर/पदविकाधारक/अंशकालीन उमेदवार18 वर्षे55 वर्षे

प्रवर्ग

प्रवर्गकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
किमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
खुला वर्गमागास प्रवर्ग
महिला उमेदवार18 वर्षे28 वर्षे33 वर्षे
खेळाडू उमेदवार18 वर्षे28+5 वर्षे33+5 वर्षे
पोलीस पाल्य18 वर्षे28 वर्षे33 वर्षे
गृहरक्षक18 वर्षे28 वर्षे33 वर्षे
माजी सैनिकांवर अवलंबून असलेले (मुलगा, मुलगी, पत्नी) उमेदवार18 वर्षे28+3 वर्षे33+3 वर्षे

शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रता
पुरूषउंची :- 165सेमी किंवा अधिक
छाती : – 79सेमी व फुगवून 84सेमी
स्त्रीउंची :- 155सेमी किंवा अधिक

WhatsApp chat